© 2020 All rights reserved
श्री करुणात्रिपदीच्या एक लक्ष सोळा हजार पाठांचा संकल्प
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी नरसी नामदेव, (जि. हिंगोली) येथील १९ व्या चातुर्मासात सकल भक्तांचा उद्धार करणाऱ्या श्रीकरुणात्रिपदीची रचना केली त्याला यंदा ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा योग साधून तसेच ब्रह्मश्री श्री.दत्तमहाराज कवीश्वर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री वासुदेव निवास पुणे, श्री करुणात्रिपदी स्मारक समिति हिंगोली, श्रीक्षेत्र दत्तधाम परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकरुणात्रिपदीच्या एक लक्ष सोळा हजार सामुदायिक पाठांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सद्भक्तांना आवाहन करणायात येत आहे की जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे. या कार्यक्रमाचे आयोजन दि. ४ मार्च २०२० रोजी नरसी नामदेव जिल्हा हिंगोली येथे करण्यात आले आहे. ज्याना प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी श्रीकरुणात्रिपदी चे यथाशक्ति पाठ करावेत. आपल्या पाठांची संख्या श्रीवासुदेव निवास कार्यालयात कळवावी.